हायलाइट्स:
- माथेफिरू तरुणाने शेजारील पाच वर्षीय मुलाची केली हत्या
- गावात धमक्या देत फिरताना पित्याने रोखले म्हणून त्यालाही संपवले
- बिहारच्या भागलपूरमधील एका गावातील धक्कादायक घटना
- पकडण्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांवरही केले हल्ले
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी रवीच्या आई ललिता देवी ही वीटभट्टीवर काम करण्यासाठी गेली होती. रवीचे वडील रुदल दिव्यांग आहेत. ते पण गावात कुणाच्या तरी घरी गेले होते. रवी आपल्या घरासमोर एकटाच खेळत होता. त्याचवेळी आरोपी दीपक घरातून शस्त्र घेऊन आला. त्याने रवीला पकडले. त्याची निर्घृणपणे गळा चिरून हत्या केली.
चिमुरड्याची हत्या केल्यानंतर आरोपी बराच वेळ मृतदेहाजवळ बसून राहिला. काही वेळानंतर तो हातात धारदार शस्त्र घेऊन गावात गेला. गावातील रस्त्यात आरोपी दीपकला त्याचे वडील सियाराम यांनी रोखले. रागाच्या भरात त्याने सियाराम यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकरी तेथे धावून गेले. त्यांनी आरोपी दीपकला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने गावकऱ्यांवरही हल्ला केला. त्यामुळे घाबरलेले गावकरी त्याला पकडण्यासाठी पुन्हा गेले नाही. माथेफिरू असलेल्या दीपकने गावात फिरून सर्वांना धमकी देण्यास सुरुवात केली. याचदरम्यान त्याच्या बाजूला आलेल्यांवर त्याने हल्ले केले. या हल्ल्यात माहेश्वरी आणि रामदेव यादव हे दोघे जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे या घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. अखेर पोलिसांनी आरोपीला पकडले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times