हायलाइट्स:

  • तोंडावर मास्क घातलेल्या महिलेवर चाकूहल्ला
  • पूर्वाश्रमीची पत्नी असल्याचे समजून केला हल्ला
  • केरळमधील कोझिकोड येथील धक्कादायक घटना
  • हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू

तिरुवनंतपुरम: केरळमधील कोझिकोडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तोंडावर मास्क लावल्याने एका व्यक्तीने आपली पहिली पत्नी असल्याचे समजून तिच्यावर रागाच्या भरात चाकूने वार केले. तोंडावर मास्क लावलेली महिला बँकेत गेली होती. ती आपली पहिली पत्नी असल्याचा समज आरोपीचा झाला. त्याने रागाच्या भरात तिच्यावर वार केले. यात ही महिला जखमी झाली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक जण घराबाहेर पडताना तोंडावर मास्क लावतो. बँका आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी जिथे लोकांचे नेहमीच येणे-जाणे असते, अशा ठिकाणी मास्क अनिवार्य आहे. अशाच प्रकारे बँकेत गेलेल्या एका महिलेने मास्क तोंडावर लावले होते. ही महिला आपली पूर्वाश्रमीची पत्नी असल्याचा समज झाल्याने एका व्यक्तीने तिच्यावर रागाच्या भरात चाकूने वार केले. केरळच्या कोझिकोडमध्ये ही घटना घडली.

५ दिवसांवर आलं होतं लग्न; मुलगी घर सोडून पळून गेली, वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल

माथेफिरूचे धक्कादायक कृत्य; आधी शेजारच्या चिमुकल्याची हत्या, नंतर जन्मदात्या पित्याला संपवले

जिल्ह्यातील एका सहकारी बँकेत ही घटना घडली आहे. बँकेत अचानक एक व्यक्ती घुसली. बँकेत एक महिला तोंडावर मास्क लावलेली होती. ती आपली पूर्वाश्रमीची पत्नी असल्याचा त्याचा समज झाला. पूर्वाश्रमीच्या पत्नीसोबत त्याचे वाद सुरू होते. याच रागातून त्याने या महिलेवर हल्ला केला. बीजू असे या हल्लेखोराचे नाव आहे. हल्ल्यानंतर आरोपीला बँकेतील कर्मचाऱ्यांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बँकेत घुसून केला हल्ला

बीजू हा दुपारी दोन वाजताच्या सुमारास बँकेत गेला होता. त्याची पत्नी याच बँकेत काम करते. आपली पूर्वाश्रमीची पत्नी कोणत्या खुर्चीवर बसते याची माहिती त्याला होती. त्याने त्याच जागेवर बसलेल्या महिलेवर हल्ला केला. महिलेच्या तोंडावर मास्क लावलेला होता. त्यामुळे तो ओळखू शकला नाही. ती आपली पूर्वाश्रमीची पत्नी असल्याचा समज त्याचा झाला. कोझिकोड जिल्ह्याच्या नानमांडाचा राहणारा बीजू जवळपास दोन वर्षांपूर्वी आपल्या पत्नीपासून विभक्त झाला होता, अशी माहिती समजते. दरम्यान, हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर कोझिकोड येथील मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते.

मालकाच्या बर्थडेला गिफ्ट म्हणून पाठवला ‘टायगर बॉम्ब’, गर्लफ्रेंडच्या मदतीनं रचला होता खतरनाक कट

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here