हायलाइट्स:

  • अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याने केले अत्याचार
  • दुष्कृत्याचा व्हिडिओ काढून केले ब्लॅकमेल
  • उत्तर प्रदेशातील नोएडातील धक्कादायक प्रकार उघडकीस
  • सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

नोएडा: उत्तर प्रदेशातील नोएडा येथील गौतमबुद्धनगरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर दुष्कृत्याचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. शेजाऱ्याने हे कृत्य केले असून, पीडितेच्या कुटुंबीयांकडे पाच लाख रुपये मागून त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेजाऱ्याने अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर अत्याचार करून व्हिडिओ तयार केला. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला ब्लॅकमेल करू लागला. आता पाच लाख रुपयांची मागणी करत असल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला आहे. तशी तक्रार तिने पोलिसांत केली आहे.

५ दिवसांवर आलं होतं लग्न; मुलगी घर सोडून पळून गेली, वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल

धक्कादायक! महिलेने दुसरं लग्न केलं म्हणून पीडित कुटुंबाला अमानुष शिक्षा

फेज दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या महिलेने पोलीस उपायुक्त वृंदा शुक्ला यांच्याकडे यासंबंधी तक्रार केली आहे. दोन वर्षांपूर्वी शेजारी राहणाऱ्या तरूणाने तिच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. तरूणाने मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर तिला ब्लॅकमेल करू लागला. व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

आरोपीने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेकडून एक लाख रुपये घेतले. त्यानंतर तो वारंवार तिच्याकडे पैसे मागू लागला. तरूणाने मुलीला धमकी दिली. तिच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. त्याच्या त्रासाला कंटाळून पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही तिच्या आईने तक्रारीत सांगितले. मुलीला त्रास देतो म्हणून पालकांनी मुलीकडील मोबाइलही बंद केला. मात्र, आरोपी तिच्या कुटुंबीयांना फोन करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आहे. तसेच पैशांची मागणी करत आहे. दरम्यान, पीडितेच्या आईने दिलेली तक्रार नोंदवून घेतली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

विचित्र आणि धक्कादायक घटना; तोंडावर मास्क होता, पहिली पत्नी समजून त्यानं…
गुजरातमध्ये ATS ची मोठी कारवाई; ६०० कोटींचे १२० किलो हेरॉइन पकडले, तीन जणांना अटक

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here