पिंपरी -चिंचवड : आधीच रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यात हल्लीची तरुणाई काही व्यवस्थित गाड्या चालवत नाही. चुकीच्या पद्धतीने गाडी चालवल्यामुळे अपघात होत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून वाहतुकीचे नियम तोडल्यामुळे किती मोठा अपघात होऊ शकतो , हे या घटनेतून समोर आलं आहे.

आळंदी रोड येथे तीन वाहनांच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. गुरुवारी (दि.11) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. राम बाळासाहेब बागल (वय २४) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून किशोर राजेंद्र बागल (रा. दिघी), सुरज जगन्नाथ घुले (२६, रा. बोपखेल), सुमित कालिदास परांडे (२८, रा. दिघी गावठाण) यांच्यासह एका अनोळखी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई बाबाजी जाधव यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ही समीर वानखेडेंची प्रायव्हेट आर्मी; नवाब मलिकांचा हल्लाबोल सुरूच
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राम आणि आरोपी किशोर हे चुलत भाऊ आहेत. दोघेजण बुलेट दुचाकीवरून जात होते. किशोर बुलेट चालवत होता. त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बुलेट विरुद्ध दिशेने नेली असता रस्त्यात विरुद्ध दिशेला आरोपी सुरज आणि सुमित यांनी त्यांची कार पार्क केली होती. त्यांनी कारचा डाव्या बाजूचा दरवाजा उघडला असता बुलेटची दरवाजाला धडक बसली.

यामुळे बुलेटवर मागच्या सीटवर बसलेला राम रस्त्यावर पडला. त्यावेळी विरुद्ध दिशेने एक टेम्पो येत होता. त्या टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्याने राम याचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here