मंगळवारी अक्कलकोट वरून एम एच १३ ए एक्स १२३७ क्रमांकाची प्रवासी जीप निघाली गंगाप्रसाद पेट्रोल पंपा समोर आली असता या जीपचे पुढचे टायर फुटले आणि जीप पलटी झाली त्यामध्ये अनेक प्रवासी रस्त्याच्या बाहेर फेकले गेले पाच जण तर रस्त्यावर पडून जागीच ठार झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन दाखल झाले त्यांनी सिव्हील हॉस्पिटल मधून अॅम्बुलन्स मागून घेतल्या जखमीना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
या अपघातात आणि प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मयतामध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे तर २ गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. इतर जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, मयतांची अद्याप ओळख पटली नाही. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी एसटी बंद असल्याने हा अपघात झाल्याचा आरोप केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times