हायलाइट्स:

  • वीरजवान मंगलसिंह परदेशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
  • शोकाकुल वातावरणात काढण्यात आली अंत्ययात्रा
  • कर्तव्यावर असताना छातीत गोळी लागल्याने आले होते वीरमरण

जळगाव : पाचोरा तालुक्यातील सावखेडा बु. येथील वीरजवान मंगलसिंह जयसिंह परदेशी (वय ३५) यांच्या पार्थिवावर आज सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान मंगलसिंह परदेशी यांना १४ नोव्हेंबर रोजी पठाणकोट येथे कर्तव्यावर असताना छातीत गोळी लागल्याने वीरमरण आले. त्यांचे पार्थिव आज सकाळी सावखेडा येथे आणण्यात आले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्ययात्रा काढण्यात आली. (शहीद जवानावर अंत्यसंस्कार)

जवान मंगलसिंह परदेशी यांना सुमारे १४ वर्ष सेवा केल्यानंतर नाईक पदावर पदोन्नती झाल्याने तीन वर्ष सेवेचे वाढवून मिळाले होते. सेवानिवृत्त होण्यासाठी सहा महिने बाकी असताना त्यांना वीरमरण आलं आहे.

Zeeshan Siddique: भाई जगताप यांच्यावर काँग्रेस आमदाराचा गंभीर आरोप; थेट सोनियांकडे तक्रार

राज्याचे जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी परदेशी कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

रांगोळ्यांचा सडा अन् ‘अमर रहे’ चा नारा..

शहीद मंगलसिंह राजपूत यांचे पार्थिव आज मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता पठाणकोट येथून विमानाने औरंगाबाद आणण्यात आले. तेथून लष्कराच्या वाहनातून सावखेडा बु. या गावी आणण्यात आले. गावातून लष्कराच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी मार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. ‘अमर रहे…अमर रहे मंगलसिंह राजपूत अमर रहे, भारत माता की जय..’ अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहचली.

२८ युनियन आहेत, कोणी कोणाचं मानायला तयार नाही, कुणाशी चर्चा करायची?; अनिल परब यांचा कामगारांना सवाल

मुलाने दिला मुखाग्नी

जवान मंगलसिंह परदेशी यांना त्यांचा १२ वर्षीय मुलगा चंदन याने मुखाग्नी दिला. पिंपळगाव (हरे.) येथील पोलिसांनी बंदुकीच्या तीन फैरीची सलामी दिली. जवान मंगलसिंह यांच्यामागे आई-वडील, पत्नी किरण, मुलगा चंदन, मुली चंचल व कांचन असा परिवार आहे.

मान्यवरांनी घेतले पार्थिवाचे अंत्यदर्शन

जवान मंगलसिंह परदेशी यांच्या पार्थिवाचे आमदार किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, पोलीस उपअधीक्षक भारत काकडे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, निवासी नायब तहसीलदार संभाजी पाटील, जिल्हा सैनिक कार्यालयाचे वेल्फेअर अधिकारी अनुरथ वाकडे, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, दिपकसिंह राजपूत, मधुकर काटे, सेवानिवृत्त सैनिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळू पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण करून अंत्यदर्शन घेतले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here