हायलाइट्स:

  • खराब रस्त्याच्या प्रश्नावर नगरमध्ये मनसेचं आंदोलन
  • नितीन गडकरी यांच्या नावाचे लावले फ्लेक्स
  • वाहने सावकाश चालवण्याचं गडकरींच्या नावानं आवाहन

अहमदनगर: खराब झालेल्या रस्त्याकडे लक्ष वेधण्यासाठी विविध प्रकाराची आंदोलने केली जातात. तर कधी वेगवेगळे फलक लावून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो. असाच एक प्रकार पाथर्डीजवळ पाहायला मिळत आहे. येथून जाणारा राष्ट्रीय महामार्ग खराब झाल्याने चालकांना सावधानतेच्या सूचना देणारे फलक केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने लावण्यात आले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांनी ते लावले आहेत. या उपरोधिक फलकांच्या माध्यमातून रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. (MNS Protest against Poor Condition of National Highway)

वाचा: ‘एकेकाळी लाल गहू मागणारा भारत आज मोदींमुळं लस निर्यात करतोय’

कल्याण-विशाखापट्टण हा राष्ट्रीय महामार्ग पाथर्डीतून जातो. अनेक ठिकाणी हा रस्ता खराब झाला आहे. त्यावर अनेक अपघातही झाले आहेत. यासंबंधी विविध संघटनांनी आजवर अनेकदा आंदोलनेही केली. मात्र, तरीही काम होत नसल्याने मनसेचे खेडकर यांनी ही वेगळी शक्कल लढविली आहे. चक्क केंद्रीय मंत्र्यांचा फोटो आणि नाव वापरून उपरोधिक स्वरूपाचे हे फलक चालकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ‘सावधान, आपला राष्ट्रीय महामार्ग अनेक दिवसांपासून खराब झाला आहे. या रस्त्यावर अनेक अपघात होऊन जीव गेलेले आहेत. तरी आपली वाहने सावकाश चालवा. आपले नम्र – नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री, भारत सरकार.’ असा मजकूर फलकावर आहे. यासोबत गडकरी यांचे छायाचित्रही आहे. खालच्या बाजूला सौजन्य म्हणून देविदास खेडकर, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना, असे नाव टाकले आहे.

फ्लेक्स

पाथर्डीच्या जवळ अनेक ठिकाणी असे फलक लावले आहेत. यासंबंधी खेडकर म्हणाले की हा महामार्ग खूपच खराब झाला आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे त्यावरून वाहन चालविणे अवघड झाले आहे. या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू असले तरी ते अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना त्रास आणि मनस्तापही सहन करावा लागत आहे. संबंधित यंत्रणेचे याकडे लक्ष वेधण्यासाठी असे फलक लावण्याची वेळ आली आहे. मनसतर्फे यापूर्वीही यासाठी अनेक आंदोलने केल्याचे खेडकर यांनी सांगितले.

वाचा: जळगाव, नांदेडमध्ये गांजा जप्त; क्रांती रेडकर-वानखेडे म्हणते…

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here