हायलाइट्स:

  • पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात धक्कादायक प्रकार
  • शतपावली करणाऱ्या मुलींचा दोघा तरूणांनी केला पाठलाग
  • दुसऱ्या दिवशीही एका मुलीचा बिल्डिंगपर्यंत केला पाठलाग
  • मार्केट यार्ड पोलिसांनी आरोपींना केली अटक

म. टा. प्रतिनिधी, पुणे : अल्पवयीन मुलींवर पाळत ठेवून त्या शतपावली करीत असताना त्यांची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार मार्केट यार्ड परिसरात घडला. पोलिसांनी या प्रकरणी दोघा रोडरोमिओंना अटक केली आहे. त्यांनी दोन दिवसांत एकाच सोसायटीत राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींची छेड काढण्यात आली आहे.

अनिकेत (वय २३) आणि मयुरेश (वय २३) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील एक तरूण बेरोजगार आहे. तर एक जण खानावळीत वेटर म्हणून काम करतो. या प्रकरणी एका ३५ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. सलग दोन दिवस हा प्रकार सुरू होता.

लग्नाच्या हॉलमधील बाथरूममध्ये तरुणीचा मृतदेह, रूममधील ‘ते’ दृश्य बघून नातेवाइक हादरले
‘त्या’ अलीशान बंगल्यात घडलं होतं भयानक; नोकरानं दरवाजा उघडताच…

तक्रारदार मार्केट यार्ड परिसरातील एका बहुमजली इमारतीमध्ये राहतात. त्यांची ११ वर्षांची मुलगी आणि तिची मैत्रीण ही सोसायटीच्या परिसरात शतपावली करीत होत्या. त्या वेळी दोघा आरोपींनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांची छेड काढली. त्यामुळे मुली घाबरल्या आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाच्या सुमारास देखील एका १३ वर्षीय मुलीला मॉर्निंग वॉक करताना त्या दोघांनी गाठले. ती मुलगी तेथून त्यांच्या सोसायटीत गेली. तेव्हा त्या दोघांनी सोसायटीच्या लिफ्टपर्यंत तिचा पाठलाग करून छेड काढली. पोलिसांकडे याबाबत तक्रार दिल्यानंतर मार्केट यार्ड पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक केली. त्यांच्यावर विनयभंगासह ‘पोक्सो’नुसार गुन्हा दाखल केला आहे.

बाथरूममध्ये पत्नी करत होती आंघोळ; हैवान इंजिनीअर पतीने केले धक्कादायक कृत्य
रात्री शेजारच्याच्या कुत्र्याच्या भुंकण्याने झोपमोड झाली; तरूणाने उचलले भयंकर पाऊल

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here