काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह १९ आमदारांना फोडून भाजपनं काँग्रेसला जोरदार धक्का दिला आहे. भाजपच्या या खेळीमुळं मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. या घडामोडींनंतर महाराष्ट्रातही अशाच पद्धतीचं ऑपरेशन राबवणार असल्याची चर्चा आहे. भाजप नेते व समर्थकांकडून तशी सूचक वक्तव्य केली जात आहेत. विधान भवनाच्या आवारात मुंडे यांना याबाबत विचारलं असता, महाराष्ट्रात असं कदापि घडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वाचा:
‘असे मुहूर्त शोधणं हे मुनगंटीवारांचं काम आहे. त्यांनी असे कितीही मुहूर्त शोधले तरी त्याचा फायदा होणार नाही. मध्य प्रदेशात झालेल्या राजकीय भूकंपाचा आनंद भारतीय जनता पक्षाला घ्यायचा असेल तर तो त्यांनी पाडव्यापर्यंतच काय, दिवाळीपर्यंत घ्यावा. कारण तसा आनंद भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्रात अजिबात मिळणार नाही, असं मुंडे म्हणाले.
महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही: थोरात
‘महाराष्ट्राच्या संर्दभात सुरू झालेल्या चर्चेला काहीही अर्थ नाही. महाविकास आघाडी अत्यंत भक्कम आहे. आम्ही एकत्र आहोत. एकत्र काम करत आहोत. इथल्या सरकारला कुठलाही धोका नाही,’ असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे.
काय होतंय ते पाहूच: फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेशातील घडामोडींबाबत बोलणं टाळलं. ‘महाराष्ट्रात सध्या अधिवेशन चाललंय. मध्य प्रदेशात काय होतंय ते पाहू,’ इतकंच बोलून ते निघून गेले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times