हायलाइट्स:

  • साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात दुफळी
  • एसटी वाहकाने वाहतूक नियंत्रकाला केली मारहाण
  • जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू

सातारा : राज्यभरात सध्या एसटी संपामुळे वातावरण ढवळून निघालं आहे. सरकारच्या विनंतीनंतरही एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेला हा संप सध्या चर्चेत आहे. मात्र साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात दुफळी निर्माण झाल्याचं चित्र दिसत असून संपाच्या नवव्या दिवशी गालबोट लागलं आहे. एसटी वाहकाने वाहतूक नियंत्रकाला मारहाण केली आहे. (महाराष्ट्रातील सेंट बसचा संप ताज्या बातम्या)

या मारहाणीत नियंत्रक अमित चिकणे यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राज्यातील आणखी एका जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू

एसटीचा संप सुरू असताना वाहक राजू पवार हे शिवशाही बस पुण्याला घेऊन गेले होते. यावर इतर संपकरी कर्मचाऱ्यांनी बस का घेऊन गेला? अशी विचारणा केली म्हणून किरकोळ बाचाबाची झाली. यावेळी राजू पवार यांनी वाहतूक नियंत्रक अमित चिकणे यांच्या डोक्यात दगड घातला.

ते म्हणाले, ‘आम्ही सीआयडीचे पोलिस आहोत’ आणि केले ‘हे’ कृत्य

या हल्ल्यानतंर घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस दाखल झाले. मारहाण करणाऱ्या वाहकास पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतलं असून त्याच्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here