
वृत्तपत्राच्या कटिंगसह कंगनाने लिहिले की, ‘एकतर तुम्ही गांधींचे चाहते आहात किंवा नेताजींचे समर्थक आहात. तुम्ही दोघे एकत्र राहू शकत नाही… निवडा आणि ठरवा.’ दुसर्या पोस्टमध्ये रणौतने दावा केला की, ‘ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांना अशा लोकांनी त्यांच्या मालकांच्या स्वाधीन केले, ज्यांच्यात जुलूमांशी लढण्याचे धैर्य नव्हते किंवा ज्यांचे रक्त कधी उसळले नाही. ते धूर्त आणि सत्तेचे लोभी होते.’ यानंतर तिने गांधींवर निशाणा साधला आणि भगत सिंग यांना फाशी द्यावी अशी त्यांची इच्छा असल्याचा पुरावा असल्याचाही कंगनाने दावा केला.
३४ वर्षीय कंगना म्हणाली, ‘हे तेच लोक आहेत ज्यांनी आम्हाला शिकवले की जर तुम्हाला कोणी कानाखाली मारली तर अजून एक कानाखाली खाण्यासाठी दुसरा गाल पुढे करा. त्यामुळे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल.’ अशाप्रकारे कोणाला स्वातंत्र्य मिळत नाही, अशा प्रकारे परमार्थ मिळू शकतो. तुमचा नायक हुशारीने निवडा.’
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times