हायलाइट्स:

  • नोकरी गेल्याने महिलेने उचलले टोकाचे पाऊल
  • रागाच्या भरात पोटच्या तीन वर्षांच्या मुलीचा घेतला जीव
  • हरयाणातील गुरुग्राममधील धक्कादायक घटना
  • महिलेला पोलिसांनी केली अटक, तुरुंगात रवानगी

गुरुग्राम: हरयाणातील साढराणा येथील गणपती नगर कॉलनीत धक्कादायक घटना घडली. एका निर्दयी आईने रागाच्या भरात आपल्या तीन वर्षांच्या मुलीचा जीव घेतला. या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री हॉस्पिटलमधून सोडल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. त्यानंतर तिला कोर्टासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर तिची रवानगी भोंडसी तुरुंगात करण्यात आली.

खासगी रुग्णालयात नोकरी करायची

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केल्यानंतर महिलेकडे चौकशी करण्यात आली. या चौकशीत तिने सर्व हकिकत सांगितली. ती एका खासगी रुग्णालयात नोकरी करत होती. जवळपास तीन महिन्यांपूर्वी तिची नोकरी गेली. तेव्हापासून ती घरीच होती. नोकरी गमावल्यानंतर तिची खूप चीडचीड व्हायची. किरकोळ गोष्टींवरून पतीसोबत तिचे वाद व्हायचे. तिला प्रचंड राग यायचा. पतीच्या एकट्याच्या पगारावर घर चालणे कठीण झाले होते. रागाच्या भरात तिने टोकाचे पाऊल उचलले. आपल्याच पोटच्या तीन वर्षांच्या मुलीची तिने गळा आवळून हत्या केली.

पुणे: शतपावली करत होत्या मुली; इमारतीपर्यंत दोघे पाठलाग करत आले अन्…

लग्नाच्या हॉलमधील बाथरूममध्ये तरुणीचा मृतदेह, रूममधील ‘ते’ दृश्य बघून नातेवाइक हादरले

ही घटना शनिवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. राजस्थानच्या भरतपूरमधील मूळ रहिवासी असलेला प्रदीप सध्या गणपती नगर कॉलनीत राहतो. सेक्टर ३३ मध्ये एका कंपनीत तो नोकरीला आहे. शनिवारी दुपारी पावणेदोन वाजताच्या सुमारास कंपनीत कामासाठी गेला होता. रात्री उशिरा बारा वाजता तो घरी परतला. त्यावेळी गेट आतून बंद होता. बराच वेळ वाट बघितल्यानंतर त्याने गेटला जोरात धक्का दिला आणि तो उघडला. घरात गेला असता, पत्नी अत्यवस्थ होती. तर पलंगावर तिची ३ वर्षांची मुलगी बेशुद्धावस्थेत पडली होती. दोघींनाही रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. तिथे मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. महिलेवर उपचार सुरू आहेत. मुलीचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. महिलेला रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर तिला अटक केली असून, कोर्टात हजर केले. तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली असून, या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे, अशी माहिती सेक्टर ९३ चौकीतील पोलिसांनी दिली.

बाथरूममध्ये पत्नी करत होती आंघोळ; हैवान इंजिनीअर पतीने केले धक्कादायक कृत्य
‘त्या’ अलीशान बंगल्यात घडलं होतं भयानक; नोकरानं दरवाजा उघडताच…

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here