हायलाइट्स:

  • भर रस्त्यात कॅब चालकाला महिलेने केली मारहाण
  • महिलेने कॉलर पकडली आणि कानफटात लगावल्या
  • दिल्लीतील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
  • कॅब चालकाच्या तक्रारीनंतर महिलेवर होणार कारवाई- पोलीस

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत भर रस्त्यात एका कॅब चालकाला महिलेने मारहाण केली. कॅब चालकाला मारहाण करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वेस्ट पटेल नगरमधील एका रस्त्यावर ही घटना घडली. ही महिला कॅब चालकाची कॉलर पकडून त्याच्या कानशिलात लगावताना दिसत आहे. तसेच त्याला ठोसेही मारताना या व्हिडिओत दिसत आहे. यापूर्वी लखनऊमध्येही अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात एका महिलेने कॅब चालकाला मारहाण केली होती. त्यानंतर त्या महिलेवर कारवाई करण्यात आली होती.

दिल्लीतील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कॅब चालकाकडून तक्रार मिळाल्यानंतर महिलेविरोधात गुन्हा दाखल करता येऊ शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, व्हिडिओत कॅब चालकाला मारहाण करताना दिसणाऱ्या महिलेच्या दुचाकीच्या क्रमांकावरून तिचा पत्ता शोधण्यात येत आहे. हा व्हायरल व्हिडिओ आठवडाभरापूर्वीचा आहे. कॅब चालक हा फरीदाबादचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येते.

मिळालेल्या माहितीनुसार, कॅब चालकाला महिला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निळ्या रंगाचा टीशर्ट आणि तोंडावर मास्क असलेली महिला कॅब चालकाला रस्त्यात कॉलर पकडून मारहाण करत आहे. घटनेवेळी आजूबाजूला लोकांची गर्दी जमलीय. या महिलेसोबत अन्य एक महिला आहे. गर्दीतील काही लोक या महिलेला दोषी ठरवत असल्याचे या व्हिडिओत ऐकायला मिळते.

निर्दयी आई! नोकरी गेल्यानं रागाच्या भरात पोटच्या ३ महिन्यांच्या मुलीचा घेतला जीव
पुणे: शतपावली करत होत्या मुली; इमारतीपर्यंत दोघे पाठलाग करत आले अन्…

ही घटना वेस्ट पटेल नगरच्या कस्तुरी लाल आनंद मार्गावरील ब्लॉक २२ मधील असल्याचे सांगितले जात आहे. महिला एका अन्य तरुणीसोबत दुचाकीवरून जात होती. रस्त्यावर गर्दी असल्याने कॅब तिथे अडकली होती. दुचाकीला वाट न दिल्याने रागाच्या भरात महिलेने दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर शिवीगाळ करत कॅबजवळ गेली. चालकाला खेचून बाहेर काढले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. काही लोकांनी या महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही अपशब्द वापरले. मारहाण होत असताना कॅब चालक शांतपणे उभा होता. त्याने कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

बाथरूममध्ये पत्नी करत होती आंघोळ; हैवान इंजिनीअर पतीने केले धक्कादायक कृत्य

रात्री शेजारच्याच्या कुत्र्याच्या भुंकण्याने झोपमोड झाली; तरूणाने उचलले भयंकर पाऊल

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here