हायलाइट्स:
- माजी दिल्ली विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादीत
- कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित
- दिल्लीत पार पडला सोहळा
योगानंद शास्त्री काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैंकी एक मानले जात होते. २०२० साली दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. आता जवळपास वर्षभरानंतर योगानंद शास्त्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सक्रीय राजकारणात प्रवेश केलाय.
वर्षभरापूर्वी भाजपचा राजीनामा
बुधवारी दिल्लीत पक्षप्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत शास्त्री यांनी पक्षप्रवेश केला. शास्त्री यांनी २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांवर तिकीटविक्रीचा आरोप केला होता. ‘प्रदेश काँग्रेसची धुरा अशा व्यक्तीजवळ आहे जो कुणाचाही मान ठेवत नाही आणि ही व्यक्ती अशा लोकांच्या संपर्कात वावरत आहे जे विधानसभा निवडणुकीत तिकीट विक्रीत सहभागी आहेत’ असं म्हणत योगानंद शास्त्री यांनी सुभाष चोपडा यांच्यावर गंभीर आरोप केले होते. हेच आपल्या पक्ष सोडण्याचं कारण असल्याचंही त्यावेळी शास्त्री यांनी म्हटलं होतं.
मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्यानं शास्त्री यांनी पक्ष सोडल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं. महरौली विधानसभा मतदारसंघातून लढण्याची शास्त्री यांची इच्छा होती. मात्र काँग्रेस नेतृत्वाकडून भ्रमनिरास झाल्यानंतर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times