नवी दिल्ली : महाराष्ट्रातील अमरावती आणि मालेगावात झालेल्या आंदोलना दरम्यान उसळलेल्या हिंसाचारावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलंय. ‘त्रिपुरातील हिंसाचाराचा आपल्या फायद्यासाठी काही जातीयवादी ताकदींचा प्रयत्न सुरू’ असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. याबद्दल सतर्क राहण्याची गरजही यावेळी पवारांनी व्यक्त केली.

गेल्या शुक्रवारी काही मुस्लीम संघटनांनी त्रिपुरातील कथित धार्मिक हिंसाचाराविरोधाचा निषेध करत शांततामय मार्गानं आंदोलन केलं होतं. या दरम्यान, महाराष्ट्रातील अमरावती, मालेगाव यांसहीत इतर काही शहरांत मुस्लीम संघटनेच्या आंदोलकांवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेबद्दल शरद पवार बोलत होते.

Yoganand Shastri: शरद पवारांच्या उपस्थितीत माजी विधानसभा अध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश
शरद पवारांकडून नवाब मलिक यांची पाठराखण, म्हणाले…
महाराष्ट्रात उसळलेल्या या हिंसाचाराबद्दल शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. ‘त्रिपुरात काही घडलं तर त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र किंवा इतर राज्यांत उमटावी, असं मला वाटत नाही. काही शक्ती या स्थितीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. मला वाटतं त्या जातीयवादी शक्ती आहे. त्यामुळे सतर्क राहण्याची आवश्यकता आहे’, असं शरद पवार यांनी म्हटलंय.

बुधवारी, दिल्ली प्रदेश काँग्रेसचे माजी नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष योगानंद शास्त्री यांनी अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महाराष्ट्रातील लातूरमध्ये चार जणांविरोधात तीन गुन्हे दाखल

दरम्यान, महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत चार जणांविरोधात शांती आणि जातीय सलोखा बिघडवण्याच्या उद्देशानं सोशल मीडियावर भडक संदेश आणि व्हिडिओ अपलोड करण्याच्या आरोपाखाली तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पोस्ट २६ ऑक्टोबर रोजी त्रिपुरात उसळलेल्या हिंसाचाराशी तसंच १२ – १३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील काही शहरांत उसळलेल्या हिंसाचाराशी संबंधित आहेत.

Comedian Vir Das: परदेशात ‘भारताची प्रतिमा मलिन’; कॉमेडियन वीर दासविरुद्ध गुन्हा दाखल
supreme court म्हणाले, ‘मंदिरात आरती कशी करायची, नारळ कसे फोडायचे, हे ठरवणं आमचं काम नाही’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here