मुंबई :’चला हवा येऊ द्या‘मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री श्रेया बुगडे नेहमीच चर्चेच असते. सोशल मीडिया ती अनेक फोटो शेअर करते. तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टाइल आणि खासगी आयुष्याचीही अनेकदा चर्चा झाली. श्रेया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बिग बॉसच्या घरात श्रेयाची एन्ट्री होणार असल्याच्या चर्चेला सध्या उधाण आलं आहे.
श्रेयानं ओटीटीवरही जोरदार एन्ट्री घेतली आहे. ‘बायकोला हवं तरी काय’ या वेबसीरिजमध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली होती. अनिकेत विश्वासराव आणि निखिल रत्नपारखी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times