अमरावती : अमरावतीत माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांना अटक करण्यात आली आहे. अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी ही अटक केली असल्याची माहिती आहे. अमरावती बंदमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये पोटे यांचाही हात असल्याच्या संशयामुळे पोलिसांनी त्यांना अटक केल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्या, या सगळ्यावर पोटे यांनी सरकारवर गंभीर टीका केली आहे. इतकंच नाहीतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हिंदूंना चिरडू नये अन्यथा तुमचं आम्ही काहीही ठेवणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे. संपूर्ण अमरावती शहरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद केल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असून राज्यसरकारने अमरावती शहरात काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण केली आहे. अमरावती शहर हे काश्मीर नाही असा आरोप माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी केला आहे.

खळबळजनक! साताऱ्यातील ‘या’ मोदींना बाँम्बने उडवून देण्याची धमकी, इंटरनॅशनल कॉल आणि मेसेजने खळबळ
‘हिंदूंनी फक्त काडी दाखवली आहे, काडी मारली नाही. काडी मारली तर अख्ख्या हिंदुस्थान पेटल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हिंदूंना चिरडू नये अन्यथा तुमचं आम्ही काहीही ठेवणार नाही’ अशी टीकाही प्रवीण पोटे यांनी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here