नवी दिल्ली : ‘राष्ट्रीय पत्रकारिता दिना’च्या निमित्तानं काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधलाय. ‘खरं बोलण्याची शिक्षा मिळत असेल तर समजा की खोट्यांची सत्ता आहे’, असं म्हणत राहुल गांधींनी भाजपवर हल्ला केला.

राष्ट्रीय पत्रकारिता दिवस‘ दरवर्षी १६ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या निमित्तानं मंगळवारी राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरून एक ट्विट केलं होतं. या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडिओही जोडला होता. या व्हिडिओमध्ये त्रिपुरासहीत अनेक ठिकाणी पत्रकारांची अटक आणि हल्ल्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

२२ वर्षीय पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ता ४ दिवसांपासून होता बेपत्ता, अखेर…
Hindu Mahasabha: ‘त्या’ तुरुंगातल्या मातीतून उभी राहणार गोडसेची मूर्ती, ‘हिंदू महासभे’ची घोषणा
दरम्यान, याच निमित्तानं सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनीही एका व्हिडिओद्वारे संदेश दिला. मीडियानं खोट्या बातम्यांपासून दूर राहण्याचं आवाहन करताना अनुराग ठाकूर या व्हिडिओत दिसले. ‘मीडिया एक नियंत्रण संस्था आहे. भारताच्या जिवंत लोकशाहीत मीडिया महत्त्वाची भूमिका बजावत असते’ असंही ठाकूर यांनी यावेळी म्हटलं.

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारीतेची स्वतंत्रता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १९ नुसार देण्यात आलेल्या अभिव्यक्तीच्या मूळ अधिकारात सुनिश्चित करण्यात आलीय.

OPINION POLL: यूपीत पुन्हा भाजपला सत्ता मिळण्याचा अंदाज, पण योगींचं काय?
त्रिपुरा हिंसाचाराचे महाराष्ट्रात पडसाद : पवारांचा ‘जातीयवादी ताकदींविरोधात’ सतर्कतेचा इशारा

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here