हायलाइट्स:
- झारखंडच्या रांची पोलिसांनी ड्रग्ज क्वीनला केली अटक
- तरुणांना जाळ्यात ओढून ड्रग्ज रॅकेटमध्ये अडकवायची
- मॉडेल तरूणीसह आणखी एका साथीदाराला ठोकल्या बेड्या
- ड्रग्ज रॅकेटचा म्होरक्या फरार, शोध सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, या मॉडेल तरूणीवर ड्रग्जच्या व्यापारामध्ये सामील असल्याचा आरोप आहे. ही मॉडेल तरूणी तरूणांना आपल्या जाळ्यात अडकवायची. त्यानंतर त्यांना ड्रग्जच्या धंद्यात ओढून तस्करीचे रॅकेट चालवायची असाही आरोप तिच्यावर आहे. ज्योती असे या मॉडेलचे नाव असल्याचे समजते. ती रांचीमध्ये ड्रग्ज तस्करीचे रॅकेट चालवायची. रांचीच्या सुखदेव नगर पोलिसांनी या मॉडेलसह दोघांना अटक केली आहे.
रांचीच्या सुखदेव नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रग्ज तस्करीचे रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी मॉडेलसह दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, या रॅकेटचा म्होरक्या घटनास्थळावरून फरार झाला. ही मॉडेल तरूणी गेल्या अडीच वर्षांपासून दिल्लीत राहत होती. नुकतीच ती रांचीमध्ये राहायला आली होती. एका ड्रग्ज तस्कराच्या संपर्कात आल्यानंतर ती रॅकेटमध्ये सामील झाली होती.
२८ ग्रॅम ड्रग्ज सापडले
मिळालेल्या माहितीनुसार, मॉडेल ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी एजंटची भरती करायची. ड्रग्ज घेणाऱ्या तरुणांना आपल्या सौंदर्याची मोहिनी घालायची. तसेच त्यांना ड्रग्जच्या रॅकेटमध्ये अडकवायची. मॉडेल तरूणीला विद्यानगर परिसरातून अटक केली आहे. तिच्याकडे २८ ग्रॅम ब्राउन शुगर सापडली असून, पोलिसांनी ती जप्त केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times