या प्रकरणी मध्य प्रदेश काँग्रेस प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजप सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. ‘पोलीस प्रशासनाच्या ठेकेदारां’नी हे आयोजन केल्याचा तसंच यात जनतेची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप कमलनाथ यांनी केला आहे.
बेपत्ता असणाऱ्या १५ नागरिकांत पुरुषांसहीत स्त्रियांचाही समावेश आहे. बेपत्ता नागरिकांत शांती बाई (८० वर्ष), बच्चू सिंह (६० वर्ष), मुकुंदा (४० वर्ष), वर्दा (५५ वर्ष), नाना बरेला (५५ वर्ष), मकना बारिया (४० वर्ष), जागलाल भारती (५५ वर्ष), कमलेश (३५ वर्ष), सूरज सिंह (६० वर्ष), मांगू (४० वर्ष), बाजारू सिंह (४० वर्ष), कमर सिंह (५५ वर्ष), गंगादास (६० वर्ष), सीताराम (४० वर्ष) आणि भैरोसिंह (४० वर्ष) यांचा समावेश आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बेपत्ता नागरिकांपैंकी कुणीही अद्याप घरी पोहचल्याची माहिती नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मध्य प्रदेशच्या चार तासांच्या दौऱ्यासाठी शिवराज सरकारकडून तब्बल २३ कोटींचा खर्च करण्यात आल्याचं समोर आलं होतं. एकूण २३ कोटींतील १२ कोटींहून अधिक पैसे केवळ आदिवासींना आयोजन स्थळावर घेऊन जाण्यासाठी खर्च करण्यात आल्याची माहिती भाजप सूत्रांनी दिली होती. यात कार्यक्रमासाठी येणाऱ्या आदिवासींच्या प्रवासाचा, राहण्याचा आणि खाण्याचा खर्चही समावेश होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times