हायलाइट्स:

  • थुंकी लावून चपात्या बनवणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
  • किळसवाणा प्रकार, पोलिसांनी केली कारवाई
  • उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये घडला प्रकार

गाझियाबाद: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील एका हॉटेलात पीठात थुंकी टाकून चपात्या बनवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलिसांनी या किळसवाण्या प्रकाराची दखल घेऊन तात्काळ कारवाई केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन, त्याची चौकशी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादमधील लोनी परिसरातील एका हॉटेलातील हा व्हिडिओ होता. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पीठाला थुंकी लावून चपात्या बनवत असल्याचे दिसत होते. पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपीला ताब्यात घेतले. लोनी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात एक व्यक्ती चपात्या तयार करत आहे. चपात्या करताना पीठाला तो थुंकी लावत असल्याचे त्या व्हिडिओत दिसतं. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तात्काळ पोलिसांनी कारवाई केली.

खळबळ! पुलवामातील तैनात CRPF जवानाला केली अटक, नक्षल्यांना पुरवायचा शस्त्रे
सौंदर्याची मोहिनी घालायची, तरुणांना अडकवायची, ‘ड्रग्ज क्वीन’च्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश

ज्या हॉटेलात हा प्रकार घडला ते गाझियाबादच्या लोनी परिसरात असल्याची माहिती मिळाली. आम्ही आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. याआधीही गाझियाबादच्या शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ढाब्यावर असाच किळसवाणा प्रकार घडला होता. ढाब्यावर तंदूर लावणारा कारागीर प्रत्येक चपातीवर थुंकी लावत असल्याचे त्यात दिसत होते. या प्रकाराची माहिती काही दक्ष नागरिकांना मिळाल्यानंतर त्यांनी या घटनेचा व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

Video व्हायरल; भर रस्त्यात महिलेने कॅब चालकाची कॉलर पकडली, कानफटात मारल्या

पुणे: शतपावली करत होत्या मुली; इमारतीपर्यंत दोघे पाठलाग करत आले अन्…

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here