हायलाइट्स:

  • २५ वर्षीय तरुणाची गळफास लावून घेत आत्महत्या
  • प्रेम प्रकरणातून केली आत्महत्या?
  • पोलिसांकडून तपास सुरू

परभणी : जिल्ह्यातील पाथरी शहरातील माळीवाडा शिवारात एका २५ वर्षीय तरुणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. अनिल दत्तात्रय चिंचाने असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. (परभणी न्यूज टुडे लाईव्ह)

प्रेम प्रकरणातून ही आत्महत्या करण्यात आल्याची परिसरात चर्चा सुरू आहे. कारण मृत तरुणाने आत्महत्येच्या काही तासांपूर्वी आपल्या फेसबुक अकाऊंटवर प्रेमिकेसोबतचे अनेक फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर केल्यानंतरच त्याने आत्महत्या करत जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.

ज्ञानदेव वानखेडे प्रकरण: उद्याच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांची हायकोर्टाला ‘ही’ विनंती

अनिलचे पाथरी शहरातील माळीवाडा येथील एका तरुणीसोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबध होते. त्यांचे प्रेम प्रकरण कुटुंबियांना माहीत झाल्यावर घरातील मंडळींनी तरुणीचा विवाह दुसऱ्या तरुणासोबत ठरवला होता. ही माहिती कळाल्यावर अनिलला मोठा धक्का बसला. यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो काहीसा तणावातही होताा. त्यानंतर आज अखेर त्याने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली.

दरम्यान, या प्रकरणी पाथरी पोलीस स्थानकात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here