भंडारा : चालकाला बेशुद्ध करून कार पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी ही टोळी जेरबंद केली आहे. पोलिसांनी या टोळीकडून १२७ झोपेच्या गोळ्याही जप्त केल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

आपल्या लठ्ठपणाचा फायदा घेत या टोळीतील सदस्य रस्त्यावर हात दाखवत कार चालकांना थांबवून लिफ्ट मागत असत. गाडीत बसल्यानंतर रस्त्यात कारचालकाला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करत त्याची कार चोरून नेली जात असे. असं कृत्य करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या ३ आरोपींना भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुष्पेंद्र उर्फ गब्बर मितजयसिंग चालुक्य (वय ४२ वर्ष), सतबीरसिंह निन्दरसिंग शेरगिल (वय ३६ वर्ष),भास्कर नंदेश्वर (वय ५२ वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. त्यांच्याकडून चोरीची अर्टिगा कार व १२७ झोपेच्या गोळ्या जप्त केल्या आहेत.

Thane Crime: ठाण्यात उच्चशिक्षित महिला चोर अटकेत; तपासात धक्कादायक माहिती उघड

आरोपी कसे अडकले जाळ्यात?

घटनेच्या दिवशी ९ नोव्हेंबर रोजी भंडारा जिल्ह्याच्या आंधळगाव येथील कैलास तांडेकर यांना आरोपी भास्कर याने आपल्या लठ्ठपणाच्या फायदा घेत लिफ्ट मागितली. मात्र काही वेळानंतर कैलास तांडेकर यांना बेशुद्ध करून त्यांची अर्टिगा कार पळवून नेत भास्कर नंदेश्वर हा फरार झाला. शुद्धीवर येताच कैलास तांडेकर यांनी तुमसर पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी संबधित तपास भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिला.

तपास सुरू असताना छत्तीसगड येथे खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, संबधित चोरीची कार विक्रीसाठी येत आहे. त्यानंतर गुन्हे शाखेने सापळा रचला असता आरोपी पुष्पेंद्र उर्फ गब्बर मितजयसिंग चालुक्य व सतबीरसिंह निन्दरसिंग शेरगिल या दोघांना अटक केली.

दरम्यान, आरोपींच्या अटकेनंतर आता आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here