औरंगाबाद: ‘करोनाची बाधा होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं आहेच, पण महाराष्ट्रात ‘करोना’च्या फारशा काही केसेस नाहीत. कुणीही दगावलेलं नाही. असं असताना प्रशासनाकडून अनेक गोष्टींवर बंदी घातली जातेय. परवानगी नाकारली जातेय. कशासाठी लोकांना विनाकारण घाबरवत आहात?,’ असा खडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष () यांनी केला आहे. मनसे शिवजयंती साजरी करणारच, असंही त्यांनी प्रशासनाला ठणकावलं आहे.

महापालिकेच्या प्रचाराच्या निमित्तानं राज ठाकरे सध्या औरंगाबादेत आहेत. औरंगाबादेत मनसेकडून होणाऱ्या शिवजयंती उत्सवातही ते सहभागी होणार आहेत. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात शिवजयंती उत्सवाला पोलिसांकडून परवानग्या नाकारण्यात येत आहेत. त्यास राज ठाकरे यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. ‘काळजी घेणं हे प्रत्येकाचं काम आहे याबद्दल दुमत नाही. पण ‘करोना’च्या नावानं ज्या प्रकारे आव आणला जातोय, त्याला काही अर्थ नाही. आपल्याकडं इतर अनेक प्रकारची रोगराई आहे. माझ्या माहितीनुसार देशात दिवसाला ४०० लोक टीबीनं मरतात. वर्षाकाठी हा आकडा दीड लाखांच्या आसपास आहे. इतकी रोगराई इथं आधीच असताना ‘करोना’वरून एवढा गोंधळ का माजवला जातोय? नाशिकला १४४ कलम लावलंय. कशासाठी लोकांना घाबरवताय? पोलिसांना याची नेमकी किती माहिती आहे,’ असा सवाल राज यांनी केला.

वाचा:

निवडणुका पुढं ढकलणार आहात का?

परदेशातून येणाऱ्या बातम्यांवरून इथं आपल्याकडं लोकांना घाबरवलं जातंय. त्यांच्याकडं परिस्थिती वेगळी असते. त्यांच्याकडं छोटंसं सुरू आहे. आपल्याइतकी रोगराई तिथं नसते. त्यामुळं इतकं घाबरण्यासारखं आणि घाबरवण्यासारखं आता तरी मला काही दिसत नाही. ‘करोना’चं नाव सांगून शिवजयंतीला परवानगी नाकारत असाल तर संभाजीनगरच्या निवडणुका अवघ्या २५-३० दिवसांवर आल्यात. त्या पुढं ढकलणार आहात का? कारण, हा एक-दोन दिवसांचा आजार नाही. अजून त्यावर औषध सापडलं नाही. मग निवडणुकांवरही निर्णय घ्या,’ असं राज म्हणाले. मनसे शिवजयंती साजरी करणारच, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here