पवारांनी केलेल्या विधानाचा अर्थबोध विरोधक शोधत आहेत. अशात जिल्ह्यात भाजपाचा गड समजल्या जाणाऱ्या मुल मध्ये त्यांची आज सभा होते आहे. मुल हे सूधिर मुनगंटीवारांचे कार्यक्षेत्र. राज्यातील राजकारणात मुनगंटीवार मोठे नाव आहे. जिल्ह्यात पाय ठेवताच पवारांची पहीली सभा मुनगंटीवारांचा कार्यक्षेत्रात होत आहे. त्यामुळे या सभेकडे जिल्हाचे लक्ष लागले आहे.
बड्या नेत्यांच्या भेटी
राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भावर लक्ष केंद्रित केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा खासदार, आमदार नसतांना जिल्ह्यात पक्षाचा बड्या नेत्यांचा भेटी वाढल्या आहेत. खासदार सूप्रिया सूळे, मंत्री छगन भुजबळ यांनी भेटी दिल्या. पक्षातील बड्या नेत्यांचा भेटीने जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यात उत्साह संचारला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे केंद्रीय अध्यक्ष शरद पवार चंद्रपूर जिल्हाचा दोन दिवसाचा दौऱ्यावर येत आहेत. आज मुल येथील तालुका क्रिडा संकुलात दुपारी दोन वाजता जाहीर सभा आयोजित केली आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल, संपर्क मंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित असणार आहे.
येत्या काळात मनपा चंद्रपूर, जिल्ह्यातील दोन नगर परिषद, पाच नगर पंचायतेचा निवडणूक होणार आहेत. त्या अनुसंगाने हा दौरा महत्वाचा ठरेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times