नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि लोकसभा सदस्य महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकारकडून लागू केलेल्या दोन अध्यादेशांविरोधात बुधवारी सर्वोच्च न्यायालय गाठलंय.

या अध्यादेशान्वये अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआय संचालकांचा कार्यकाळ दोन वर्षांच्या अनिवार्य कार्यकाळानंतर तीन वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकेल. तृणमूल काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्यानुसास, केंद्राचा हा अध्यादेश सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध आहे.

Farmers Protest: मोदी-योगींना उत्तर प्रदेशात उतरू देणार नाही, राकेश टिकैत यांचा इशारा
vir das video controversy : वीर दासच्या व्हिडिओवरून वाद; परस्पर विरोधी मतांमुळे काँग्रेस नेते आले चर्चेत

सीबीआय आणि ईडी संचालकांच्या कार्यकाळ विस्ताराशी संबंधीत केंद्रीय अध्यादेशांना आव्हान मी देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध आहेत, असं ट्विट महुआ मोईत्रा यांनी केलंय.

केंद्र सरकारच्या याच अध्यादेशांना आव्हान देणारी ही दुसरी याचिका ठरलीय. या अगोदर वकील एम एल शर्मा यांनी मंगळवारी याच पद्धतीची याचिका दाखल केली होती.

supreme court : लखीमपूर प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा योगी सरकारला झटका; निवृत्त न्यायमूर्ती जैन यांची केली नेमणूक
अखेर न्याय मिळाला! सौरभ कृपाल ठरणार देशातील पहिले समलैंगिक न्यायाधीश

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here