बारामती : हल्ली देशभरातच काय तर प्रत्येक राज्यात गुन्ह्यांच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. शुल्लक कारणांमुळे हत्या, आत्महत्या अशा घटना आपण रोजच पाहतो. असाच एक धक्कादायक प्रकार बारामतीमध्ये समोर आला आहे. ही घटना अशी आहे की वाचून तुम्हालाही संताप येईल. राग अनावर झाल्याने काय होऊ शकतं याचं भयंकर उदाहरण म्हणजे ही घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फक्त वीस रुपये न दिल्याच्या रागातून एका माथेफिरूने भाजीविक्रेत्याचा खून केल्याची खळबळजनक घटना बारामतीमध्ये घडली आहे. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली असून त्याची रवानगी सध्या येरवडा जेलमध्ये करण्यात आली आहे. पण या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे.

पोटात दुखते म्हणून महिलेने रुग्णालय गाठले अन् बसला सुखद धक्का…; नागपुरात घडली अनोखी घटना
फारुख तांबोळी वय ५५ राहणार कसबा बारामती, असे या घटनेत मयत झालेल्या भाजीवाल्याचं नाव आहे. तर याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी अनिकेत शिंदे या २२ वर्षीय माथेफिरुला अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी दारू पिण्यासाठी वीस रुपये न दिल्याच्या रागातून आरोपी शिंदे याने तांबोळी यांच्यावर लोखंडी हत्याराने हल्ला केला होता. यात गंभीररीत्या जखमी झाल्याने तांबोळी यांना उपचारासाठी पुण्यात दाखल करण्यात आले होते.

अखेर आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा केला आहे तर अधिक तपास सुरू आहे. खरंतर, अवघ्या २२ वर्षीय तरुणाने हा हल्ला केल्यामुळे हल्लीची तरुणाई गुन्ह्यांच्या विखळ्यात जात असल्याचं पालकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आपल्या मुलांना चांगल वळण लावणं हेच आता प्रत्येक पालकांच्या हातात आहे.
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं टोकाचं पाऊल, चांगला भाव मिळाला नाही म्हणून अख्खी बागच केली उद्ध्वस्त

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here