marathwada water grid project pdf: मराठवाडा सुखावणार! बळीराजासाठी आली Good News, जिल्ह्यात आनंदाचं वातावरण – good news for marathwada due to increase in ground water level
हिंगोली : राज्यातील मराठवाड्यातील आठही जिल्ह्याची ओळख तशी दुष्काळी जिल्हे म्हणूनच आहे. परंतू, गेल्या दोन वर्षापासून सरासरीपेक्षा जास्त पाऊस होत आहे. त्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईचा प्रश्न मिटला असला तरी अनियमित पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सद्य:स्थितीला मराठवाड्यातील आठही प्रकल्प हे पाण्याने भरलेली आहेत. त्यामुळे पिण्याचा आणि शेती सिंचनाचा प्रश्न हा मार्गी लागलेला आहे.
मराठवाड्यातील उस्मानााबाद, लातुर, बीड जिल्ह्यातील नागरिकांना कायम पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस होत असल्याने शेती सिंचनाचेही अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत. उलट अधिकच्या पावसाने यंदा तर खरिपातील पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. नवाब मलिक यांचा धक्कादायक गौप्यस्फोट; म्हणाले, वानखेडेंनी पहिल्या पत्नीच्या मामेभावाला… मराठवाड्यातील काही जिल्हयात ढगफुटी सारखा तर काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, आता या रब्बी या पिकांना मोठा फायदा होणार आहे.यापुढे पोषक वातावरण राहिले तर हरभरा,गहू, ज्वारी, ई पिके जोमात येतील असा अंदाज शेतकरी वर्गातून वर्तवला जात आहे.