बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात संप करणाऱ्या एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर अखेर त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कुठलाच तोडगा निघत नाही वरून सरकार एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करत आहे. त्यामुळे आपलेही निलंबन होईल या भीतीने बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव आगारात सहाय्यक तांत्रिक पदावर कार्यरत असलेल्या विशाल अंबलकार याने टोकाचं पाऊल उचलत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता दुर्दैवाने त्यांचा रात्री ९ वाजता उपचारा दरम्यान अकोला येथे मृत्यू झाला आहे.
तीन दिवसांपूर्वी सरकार एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करत आहे, त्यामुळे आपलेही निलंबन होईल या भीतीने खामगाव आगारात सहाय्यक तांत्रिक पदावर कार्यरत असलेल्या विशाल अंबलकार या कर्मचाऱ्याने आपल्या घरी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला केला होता. या कर्मचाऱ्याला तात्काळ खामगाव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते पुढील उपचारासाठी अकोला येथे सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान उपचार सुरू असताना त्यांचा रात्री ९ वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला आहे.
या घटनेमुळे बुलडाणा जिल्ह्यात एकच खळबळ माजली असून संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी अश्याच आत्महत्या करायच्या का ? असा संतप्त सवाल एसटी कर्मचारी विचारत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times