हायलाइट्स:

  • दिल्लीतील दुहेरी हत्याकांडाची पोलिसांनी केली उकल
  • पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती आली समोर
  • बंगल्यात दोन महिलांची झाली होती हत्या
  • पाच आरोपींना केली अटक, शंभर-दीडशे सीसीटीव्ही फुटेज तपासले

नवी दिल्ली: जंगपुरा एक्स्टेन्शमधील के-ब्लॉकमध्ये एका घरात दोन महिला कामगार मृतावस्थेत आढळल्या होत्या. या दोघींची हत्या करण्यात आल्यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस चौकशीत या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा झाला आहे. चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, चोरीच्या उद्देशातून ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार हा या बंगल्यात पूर्वी काम करणाऱ्या नोकराचा पुतण्या असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून विदेशी चलनासह ९० लाख रुपये जप्त केले आहेत. डीसीपी इशा पाण्डेय यांनी सांगितले, की, मीना राय (वय ३५) ही पहिल्या मजल्यावरील बेडवर मृतावस्थेत आढळून आली. तिचे हातपाय हे प्लास्टिकने बांधण्यात आले होते. तिच्या तोंडावर पट्टी बांधण्यात आली होती. तर सुजैला गुरंग ही दुसऱ्या मजल्यावरील खोलीत मृतावस्थेत आढळली होती.

मुंबईत फ्लॅटच्या शोधात होती गुजरातची तरूणी, तिच्यासोबत असं काही विचित्र घडलं की…

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन पथके स्थापन करण्यात आली. पोलिसांनी परिसरातील जवळपास शंभर ते दीडशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चित्रित झालेले फुटेज तपासले. यात पाच संशयित दिसून आले. तर दुसऱ्या एका फुटेजमध्ये संशयित दुचाकीवर दिसून आला. अन्य एका फुटेजमध्ये दुचाकीचा क्रमांक दिसून आला. त्यावरून संशयित आरोपीची ओळख पटली. तो या बंगल्यात पूर्वी काम करत असलेल्या नोकराचा पुतण्या असल्याची माहिती मिळाली. तो आपल्या काकीला या बंगल्यात सोडण्यासाठी आणि तिला घेण्यासाठी येत असे. या बंगल्यात किमान ३० ते ४० लाख रुपये असावेत असा त्याला अंदाज होता. त्यानंतर चोरीच्या उद्देशाने त्यांनी बंगल्यात प्रवेश केला. त्यांनी या दोघींची हत्या केली. इतर चार आरोपींना शहरातील वेगवेगळ्या भागांतून अटक करण्यात आली आहे. ते पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्यांना पकडले.

नवी दिल्ली: राष्ट्रपती भवनात कार घुसवण्याचा प्रयत्न, बॅरिकेड्स तोडले

काय घडलं त्या रात्री?

पाचपैकी चार आरोपी हे बंगल्याची भिंत ओलांडून आत आले. ते मागच्या दाराने बंगल्यात घुसले. ते दार आधीपासूनच खुले होते. त्यांनी दोघींची हत्या केल्यानंतर त्यातील तिघे हे रिक्षाने पसार झाले. तर दोघांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत आपण टिपले जाऊ नये म्हणून चेहरे झाकले होते. त्यांनी आपली दुचाकी ही बंगल्यापासून दोन-तीन किलोमीटरवर पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी ते सर्व आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होते. लुटलेल्या पैशांतून त्यांना उद्योग सुरू करायचा होता. सर्व आरोपी हे शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here