हायलाइट्स:

  • सपना चौधरीला कधीही अटक होण्याची शक्यता
  • लखनऊ कोर्टाने जारी केले अटक वॉरंट
  • कार्यक्रम रद्द केल्यानंतर तिकीटाचे पैसे परत न केल्याचा सपनावर आरोप

मुंबई : हरियाणामधील प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी ही कायम या ना त्या कारणाने चर्चेत असते. पुन्हा एकदा सपना वादाच्या भोवऱ्यात अडकली असून तिच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. लखनऊ येथील न्यायालयाने सपनाविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. सपनावर डान्स कार्यक्रम रद्द केल्यानंतर त्याच्या तिकिटाचे पैसे परत न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी २२ नोव्हेंबरला होणार आहे.

काय आहे प्रकरण

ज्या गुन्ह्याखाली सपना चौधरीविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे ते प्रकरण तीन वर्ष जुने आहे. १३ ऑक्टोबर २०१८ रोजी स्मृती उपवनमध्ये सपना चौधरीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी ३०० रुपये शुल्क आकारण्यात आले होते. या कार्यक्रमाचे हजारो तिकीट विकली गेली होती. ज्या दिवशी हा कार्यक्रम होणार होता, त्या दिवशी कार्यक्रमस्थळी हजारो लोक जमा झाले होते.

सपना चौधरी

ठरलेल्या वेळी सपना चौधरी तिथे गेलीच नाही परिणामी हा कार्यक्रम रद्द झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रेक्षकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. त्यांनी तिकिटाचे पैसे परत मागितले. परंतु तेही देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे काहींनी १४ ऑक्टोबर २०१८ ला याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

त्या तक्रारीमध्ये सपना चौधरीसोबत या कार्यक्रमाचे आयोजक जुनैद अहमद, नवीन शर्मा, किवद अली, अमित पांडे, रत्नाकर उपाध्याय यांचाही उल्लेख केला होता. याप्रकरणी लखनऊ कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी अतिरीक्त मुख्य न्यायमूर्ती शांतनु त्यागी यांनी सपना चौधरी बरोबरच संयोजकांविरोधत अटक वॉरंट जारी केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here