राज्यात ऐन उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे आधीच शेतकरी हैराण आहे. अशात आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची कोरड्या ठिकाणी व्यवस्था करावी असं सांगण्यात आलं आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडू शकतो असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोकणच्या किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे आणि यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. पुढच्या ४८ तासांत हे कमी दाबाचं क्षेत्र किनारपट्टीपासून दूर जाऊन अजून दाट होऊ शकतं. त्यामुळे राज्यात तुफान पाऊस होऊ शकतो. (weather update maharashtra unseasonal rainfall upcoming 4 days heavy rain in maharashtra imd alert todays weather)
(weather update maharashtra अवकाळी पाऊस आगामी 4 दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस imd अलर्ट आजचे हवामान)
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times