पुणे : पुण्यात काळजाचा ठोका चुकावणारी एक घटना समोर आली आहे. एखाद्याचा अशा प्रकारे मृत्यू होऊ शकतो याबद्दल आपण कधी विचारलही केला नसेल असं काहीसं पुण्यात घडलं आहे. जनावरांसाठी चारा कटिंग करणाऱ्या कुट्टी मशीनमध्ये गळ्यातील स्कार्प आणि केस अडकल्यामुळे १७ नोव्हेंबर २०२१ रोजी एका २१ वर्षीय नवविवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात घडली आहे.

आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव गावात ही दुर्दैवी घटना घडली. सोनाली अजय दौंड (वय २१) असं मृत नवविवाहितेचे नाव आहे. जनावरांना चारा कटिंग करून घालण्याच्या कुट्टी मशीनमध्ये सोनालीचा गळ्यातील स्कार्प आणि केस गुंतले होते. यात सोनालीला गळफास लागला व तिचा मृत्यू झाला.

पती-पत्नीचा सोबतच झाला मृत्यू, ट्रकने दुचाकीला चिरडल्याने भीषण अपघातात भयंकर घडलं!
नेहमीप्रमाणे सोनाली जनावरांसाठी कटिंग मशीनवर चारा काढत होती. पण, अचानक तिची ओढणी कटिंग मशीनमध्ये अडकली आणि तिच्या मानेला हिसका बसल्यानंतर केसही आत ओढले गेले, त्यामुळे तिला गळफास बसला. घरातील सदस्यांनी तातडीने धाव घेऊन तिला मशीनपासून बाजूला केले आणि घराच्या ओट्यावर आणले. त्यावेळी सोनाली हीला पाहिले असता ती काही शब्द बोलत नव्हती.

यानंतर तिला तातडीने खाजगी गाडीने पारगांव येथे नेले असता तेथून पुढे रुग्णवाहिकेमधून उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी सोनालीला मृत घोषित केले. याबाबत आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील पोलीस ठाण्यात अकास्मात मयत अशी नोंद करण्यात आली आहे. सोनालीच्या अकास्मात मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

‘भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची आहे’, अमरावतीच्या हिंसाचारावरून पवार बरसले

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here