हायलाइट्स:
- राष्ट्रवादीच्या आमदाराला मारहाण
- लोकप्रतिनिधीलाच मारहाण झाल्याने शहरात खळबळ
- पोलिसांनी आरोपीला केली अटक
जिल्ह्यातील पाथरी शहरातील कबरस्थान परिसर येथे आमदार दुर्रानी आपल्या समर्थकांसह उभे असताना पाथरी शहरातील मोहम्मद सईद या इसमाने दुर्रानी यांच्यासोबत वाद घालत त्यांच्या श्रीमुखात लगावली. दरम्यान, बाबजानी दुर्रानी यांच्या समर्थकांनीही हल्लेखोराला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्रानी यांनी त्यांना मज्जाव केला.
आमदारालाच मारहाण झाल्याने पाथरी शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. तसंच व्यापाऱ्यांकडून पाथरी बंदची हाक देण्यात आली. मात्र आमदार दुर्रानी यांनी बंद न करण्याचे आवाहन केलं असून शांतता ठेवण्याचंही आवाहन केलं आहे.
आरोपी मोहम्मद बिन सईद याला पाथरी पोलिसांनी अटक केली असून आरोपीविरोधात पाथरी पोलीस ठाण्यात कलम २९४, ३२३, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आमदार दुर्रानी यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्या या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. दुर्रानी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पाथरी शहरासह जिल्हाभरात निषेध व्यक्त केला जात आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times