हायलाइट्स:
- कोर्टातील चेंबरमध्ये घुसून न्यायाधीशांवर पिस्तूल रोखले
- न्यायाधीशांना दोन पोलीस अधिकाऱ्यांनी केली मारहाण
- बिहारमधील मधुबनी येथील झंझारपूर येथील घटना
- पाटणा हायकोर्टाने न्यायाधीशांवरील हल्ल्याच्या घटनेची घेतली गंभीर दखल
या घटनेनंतर पाटणा हायकोर्टाने अपर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अविनाश कुमार यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. बिहारच्या पोलीस महासंचालकांना २९ नोव्हेंबर रोजी या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मधुबनीच्या झांझारपूर कोर्टातील न्यायाधीश अविनाश कुमार हे विविध प्रकरणांतील खटल्यांवर दिलेल्या निर्णयांसाठी प्रसिद्ध आहेत. काही दिवसांपूर्वीच न्यायाधीशांनी पोलीस अधीक्षकांबाबत टिप्पणी करतानाच, पोलीस अधीक्षकांना कायद्याची काहीही माहिती नाही, त्यांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात यावे, असे आदेश दिले होते.
तत्पूर्वी, न्यायाधीश अविनाश कुमार यांनी एका प्रकरणात घोघरडीहा पोलीस ठाण्याचे प्रभारी गोपाल कृष्ण यादव यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास लंच ब्रेक झाला होता. न्यायाधीश हे कोर्टातून आपल्या चेंबरमध्ये गेले होते. त्याचवेळी घोघरडीहा पोलीस ठाण्याचे प्रमुख गोपाल कृष्ण यादव आणि त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक अभिमन्यू कुमार सिंह हे न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये घुसले. त्यांनी न्यायाधीशांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना मारहाण केली. चेंबरमध्ये गोंधळाचा आवाज ऐकून इतर वकील चेंबरमध्ये केले. झंझारपूर कोर्टाचे ज्येष्ठ वकील आणि बार असोसिएशनचे उपाध्यक्ष बलराम साहू आणि अरूण कुमार झा यांनी सांगितले की, जेव्हा ते चेंबरमध्ये पोहोचले तेव्हा अविनाश कुमार यांच्यावर पिस्तूल ताणले होते. दोन पोलीस अधिकारी त्यांना शिवीगाळ करत होते. त्यांना मारहाण करत होते.
प्रत्यक्षदर्शी वकिलाने सांगितले की, पोलीस अधिकारी न्यायाधीशांना मारहाण करत होते. तुमची हिंमत कशी झाली आम्हाला कोर्टात बोलावण्याची? असे ते न्यायाधीशांना उद्देशून बोलत होते. तुमचे अधिकार कमी झालेले आहेत. तरीही तुम्ही विनाकारण आम्हाला त्रास का देता, तुम्हाला आम्ही एडीजे मानत नाहीत, असे ते बोलत होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times