why do i feel death is near: मृत्यूपूर्वी मरणारा वारंवार बोलतो एकच वाक्य, अनेकांचं मरण पाहणाऱ्या नर्सचा धक्कादायक खुलासा – what happens just before death nurse shares people experience
मुंबई : मृत्यूनंतर काय होतं (What Happens After Death) कोणालाच माहीत नाही. जगभर लोक फक्त याबद्दल अंदाज लावत असतात की मृत्यूनंतर मानवी आत्म्याचे काय होते? त्यावर अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत. यासोबतच मृत्यूच्या मुखातून परत आल्याचा दावा करणारे अनेक लोक हेही सांगतात की, मृत्यूनंतर प्रत्यक्षात काय होतं? त्याच्या शरीराचं काय झालं आणि त्याच्या आत्म्यानं काय पाहिलं? असे अनेक प्रश्न असतात. पण वास्तव कोणालाच माहिती नाही. या सगळ्या ज्युली नावाच्या नर्सने सोशल मीडियावर एख मोठा दावा केला आहे.
ज्युली नावाची ही परिचारिका खरंतर एक हॉस्पिस नर्स आहे. म्हणजेच ती अशा लोकांची काळजी घ्यायची जे खूप आजारी आहेत. त्यांचा कधीही मृत्यू होऊ शकतो. ज्युलीने तिच्या डोळ्यांसमोर अनेकांना मरताना पाहिलं आहे. यासंबंधी ज्युलीने सोशल मीडियावर सांगितलं की, तिने आतापर्यंत ज्या रुग्णांची काळजी घेतली आहे त्यातील बहुतेक रुग्ण मृत्यूपूर्वी सारख्या गोष्टी बोलतात. तिलाही हे आश्चर्यकारक वाटायचं. पण हे खरं आहे असं ती म्हणते. ज्युलीने तिच्या टिकटॉक अकाउंटवर याचा खुलासा केला आहे. @hospicenursejulie, Zipper या नावाने ती Tiktok वर आहे. तिला ३ लाख ८० हजार लोक फॉलो करतात. मुंबई हादरली! कॅटरिंग व्यवसायिकाची आत्यहत्या, सुसाईट नोटमध्ये राजकीय नेत्यांची नावं ज्युलीने खुलाश्यामध्ये म्हटलं आहे की, तिच्या बहुतेक रुग्णांना मृत्यूपूर्वी सावली दिसते. ते आपल्या मृत नातेवाईकांकडे पाहू लागतात. किंवा एखाद्या आत्म्याशी बोलणं सुरू करतात. विशेषतः नातेवाईक. रुग्ण त्यांना मी घरी येत असल्याचं सांगत असतो. ज्युलीने पुढे सांगितले की, मृत्यूपूर्वी बरेच लोक ‘आय लव्ह यू’ म्हणतात.
एका दुसर्या व्हिडिओद्वारे, ज्युलीने म्हटलं आहे की, मरण्यापूर्वी तिच्या मृत नातेवाईकांना पाहणं एक सामान्य गोष्ट आहे. इतकंच नाहीतर मृत्यूपूर्वी मानवी शरीरात अनेक बदल होत असतात. यामध्ये श्वासोच्छवासाची पद्धत, त्वचेचा रंग, ताप, तब्येत बिघडणे असे प्रकार सर्रास घडतात. ज्युलीच्या मते, मृत्यूपूर्वी लोकांची त्वचा जांभळी होते. यासोबतच तोंडातून तीव्र वास येऊ लागतो. या सर्व गोष्टी आता माणूस जास्त काळ जगू शकणार नाही याचं लक्षण आहे. तिच्या या दाव्यामुळे सध्या जगभरात खळबळ उडाली आहे.