हायलाइट्स:

  • क्वारंटाइनमध्ये असताना महिला डॉक्टरवर बलात्कार
  • चेन्नईतील घटना, दोन सहकारी डॉक्टरांना केली अटक
  • घटनेनंतर डॉक्टर महिलेला मोठा धक्का, दीर्घ रजेवर गेली होती
  • हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य आले समोर

चेन्नई: सहकारी महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याच्या आरोपांखाली दोन सरकारी डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली आहे. चेन्नईच्या टी नगरमधील एका हॉटेलात यावर्षी ऑगस्टमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. घटना घडली त्यावेळी ही महिला डॉक्टर क्वारंटाइनमध्ये होती.

चेन्नईतील टी नगर परिसरातील एका हॉटेलच्या खोलीत पीडित महिला डॉक्टर क्वारंटाइनमध्ये होती. त्यावेळी दोन डॉक्टरांनी तिच्यावर अत्याचार केला असा आरोप आहे. पोलिसांत या प्रकरणी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपी डॉक्टरांना अटक केली आहे. गुरुवारी या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

धक्कादायक! मुलीवर होतं प्रेम, कुटुबीयांनी तरूणाला झाडाला बांधून केली मारहाण, जागीच मृत्यू
भयंकर! सासऱ्याने तलवारीने सूनेचे दोन्ही हात कापले; ९ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी पुन्हा जोडले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टरला ऑगस्टमध्ये एका हॉटेलच्या खोलीत क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी पीडिता हॉटेलच्या खोलीत एकटीच होती. त्यावेळी तिचे दोन्ही सहकारी डॉक्टर खोलीत घुसले. त्यांनी तिच्यावर अत्याचार केले. या घटनेनंतर पीडितेला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे ती दीर्घ रजेवर गेली होती. गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये ती पुन्हा सेवेत रुजू झाली होती, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

पीडित महिला डॉक्टरने बुधवारी शहर पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, फ्लावर बाजार पोलिसांनी बुधवारी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली. पोलिसांनी या घटनेनंतर ज्या हॉटेलमध्ये ही घटना घडली होती, तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. मध्यरात्री दोन्ही डॉक्टर या महिलेच्या खोलीत शिरल्याचे फुटेजमध्ये दिसून आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

घटनेनंतर पीडित डॉक्टर दीर्घ रजेवर

या घटनेनंतर महिला डॉक्टरला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यानंतर पीडिता दीर्घ रजेवर गेली. या घटनेची माहिती तिने आपल्या पालकांना दिली. याबाबत तक्रार दाखल करण्यास सांगितले. सध्या पीडित महिला डॉक्टरचे समुपदेशन करण्यात येत आहे. या घटनेची चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

भयंकर! मूल होत नाही म्हणून सूनेची हत्या, गुपचूप मृतदेहावर अंत्यसंस्कार करत होते, इतक्यात…

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here