हायलाइट्स:
- दिल्लीतील रोहिणी भागात पोलीस अधिकाऱ्याला तरुणाची मारहाण
- वाहनाची कागदपत्रे मागितली म्हणून अधिकाऱ्याच्या बोटं चावली
- दिल्ली पोलिसांनी आरोपी तरूणाला केली अटक, गुन्हा दाखल
रिपोर्टनुसार, वाहन तपासणी दरम्यान एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने एका तरूणाला हटकले. त्याला पकडून त्याच्याकडे वाहनाची कागदपत्रे मागितली. त्यावर तरुणाने वाहतूक पोलीस विभागातील सहायक पोलीस निरीक्षकाशी हुज्जत घातली, असे सांगितले जात आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तरूणाने आधी सहायक पोलीस निरीक्षकाला थप्पड लगावली. त्यानंतर त्या तरूणाने अधिकाऱ्याच्या हाताच्या बोटांना चावा घेतला.
या प्रकरणी केएन काटजू मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी संबंधित तरूणाला अटक केली आहे. अशी माहिती मिळाली आहे की, पोलिसाला मारहाण करणारा तरूण हा पीतमपुरा येथील रहिवासी आहे. त्याला अटक करून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times