मोदींच्या या निर्णयानंतर देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. एकीकडे लोकांनी शेतकऱ्यांचा विजय झाल्याचं म्हटलं तर दुसरीकडे हा कायदा रद्द करायला नको होता असंही म्हटलं. कायदा रद्द केल्याचं दुःख सर्वात जास्त कोणत्या कलाकाराला झालं असेल तर ती म्हणजे . बॉलिवूडच्या क्वीनने सोशल मीडियावर यासंबंधीचं मतही मांडलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री हिने मात्र समाधान व्यक्त केलं. सोशल मीडियावर पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या घोषणेचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले की, ‘याच्यासोबतच गुरुपर्व दिनाच्या सर्वांना शुभेच्छा ‘असे तिने लिहिले आहे.
अभिनेत्री हिमांशी खुराने हिने देखील पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. याबद्दल तिने लिहिले आहे की, ‘अखेर आपला विजय झाला. सर्व शेतकरी बांधवांना खूप साऱ्या शुभेच्छा. गुरू नानक देवजी प्रकाश पर्वाचा हे सर्वांना बक्षिस आहे. सर्वांना गुरूपर्वाच्या शुभेच्छा…’
अभिनेत्री ऋचा चड्ढा हिनेदेखील पंतप्रधानांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. तिने लिहिले की, ‘भारताने आपल्या शेतकऱ्यांकडून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. सलाम! तुम्ही जिंकला आहात! तुमच्या विजयामध्येच सर्वांचा विजय आहे.’
अभिनेता सोनू सुदने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विषयक कायदा मागे घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. याबाबत त्याने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले की, ‘शेतकरी आता पुन्हा त्यांच्या शेतात जातील… देशातील शेती पुन्हा बहरेल… धन्यवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही ऐतिहासिक निर्णय घेतला. तुमच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे हे प्रकाश पर्व ऐतिहासिक झाले आहे… जय जवान जय किसान…’
बॉलिवूडमधील कलाकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे अभिनेत्री कंगना रणौतने मात्र या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिताना ती म्हणाली की, ‘अतिशय दुःखद, निराशाजनक आणि एकदम चुकीचे… जर संसदेमध्ये बसलेल्या सरकारऐवजी गल्लीमध्ये बसलेले लोक कायदे तयार करू लागले तर हा देखील एक जिहादी देश आहे असे विचार करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा.’
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times