हिंगोली : आताच्या युगात जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कल आधुनिक शेतीकडे वाढलेला आहे. कारण, पारंपरिक पद्धतीने शेती केल्याने शेतकऱ्यांना त्या शेतीमधून पाहिजे असे उत्पादन मिळत नाही. एवढेच नाही तर शेतीमध्ये लागवडीसाठी केलेला खर्च सुद्धा निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते आणि आर्थिक अडचणी सुद्धा त्यांना खूप येतात.

आज शेतकरी वर्ग तिच शेती आधुनिक पद्धतीने करत असल्याने अगदी कमी वेळेत आणि कमी कष्ट करून जास्तीत जास्त उत्पन्न काढत आहेत. अलीकडच्या काळात विविध आजारांबरोबर गुणकारी असलेल्या ‘ड्रॅगन फ्रूट’ ची आपल्याकडे मोठी चर्चा होऊ लागली. थायलंड, व्हिएतनाम, इस्रायल, श्रीलंका आदी देशांत लोकप्रिय असलेल्या या फळाची आता भारतातही यशस्वी लागवड होऊ लागली आहे. याचे अनुकरण करीत या वनस्पतीने आपली मूळ हिंगोली जिल्ह्यात सुध्दा रोवांयला सुरूवात केली आहे.

मृत्यूपूर्वी मरणारा वारंवार बोलतो एकच वाक्य, अनेकांचं मरण पाहणाऱ्या नर्सचा धक्कादायक खुलासा
हिंगोली मधल्या गोंधनखेडा गावातील शेतकरी रमेश जाधव यांनी या शेतीचा प्रयोग केला आणि हा प्रयोग यशस्वी सुध्दा झाला आहे. जाधव यांनी पारंपारिक पिकांना बाजू देत २०१८ मध्ये ड्रॅगन शेतीची लागवड केली. पहिल्या वर्षी ५०००० हजार रु , दुसऱ्या वर्षी १५०००० लाख रु तर तिसऱ्या वर्षी जवळपास खर्च जाता ३ लाख रूपये उत्पन्न निघालं. इतर पिकांपेक्षा ड्रॅगन शेती फायदेशीर असल्याचं जाधव सांगतात. प्रायोगिक तत्त्वावर जाधव यांनी सद्या काही शेतीवर स्टोबेरीची लागवड केली आहे. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करन्याची जाधव यांना आवड आहे.

अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकरांची तब्येत खालावली, पण मागण्या मान्य होईपर्यंत उपचारालाही नकार

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here