सातारा : कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण आहे. कोयना धरणाला महाराष्ट्राची वरदायणी म्हणुन सुद्धा संबोधलं जातं पावसाळ्यात कोयना धरण भरलं की याचा आनंद महाराष्ट्रातील जनसामान्यांना होतो. याच धरणातून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचा राज्यांचा प्यायच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटतो. त्याच सोबत महाराष्ट्राच्या वीजेचा प्रश्न सुद्धा हेच धरण सोडवतं.

कोयना धरण उभं राहिलं ते १९६३ साली. तेव्हा पासून या धरणाचा महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये प्रचंड मोठा वाटा आहे. कोयना धरणाच्या पाण्यावरून निर्माण होणारी वीज गेले, कित्तेक वर्ष महाराष्ट्राला प्रकाशमान करत घरातील गरजा भागवत आहे. महाराष्ट्रात वितरीत केली जाणारी वीज महानिर्मीतीच्या मार्फत तयार केली जात होती.

कमी कष्टात मिळवा बक्कळ पैसा, ‘या’ प्रकारची शेती आणि लाखो रुपये कमवा
मात्र, यापुढे कोयना धरणाचा तीसरा टप्पा आणि पायथा वीज निर्मीती प्रकल्प खाजगी तत्वावर म्हणजेच बीओटी तत्वावर दिला जाणार आहे. ३५ वर्ष हा करार महावीजनिर्मीतीकडे होता. भाडे तत्वावर दिल्या गेलेल्या या प्रकल्पाला ३५ वर्ष पुर्ण झाल्यानंतर भाडे पट्टा रक्कम मिळने बंद झालं होतं. त्यानंतर हा प्रकल्प पुन्हा जलसंपदा विभागाच्या ताब्यात घेवून आता तिसरा टप्पा आणि पायथा वीज निर्मीती प्रकल्प हा बीओटी तत्वावर देण्याचं मंजुर झालं आहे.

जलसंपदा विभागानं तसा जीआर जारी केला आहे. महाराष्ट्रातील ३५ वर्ष पुर्ण झालेल्या प्रकल्पांचे नुतनीकरण, आधुनिकीकरण आणि परिचालन करण्यासाठी निवीदा मागवल्या जाणार आहेत. राज्यातील आणखी चार प्रकल्पसुद्धा जलसंपदा विभागकडे हस्तांतरीत केले जाणार आहेत.

मृत्यूपूर्वी मरणारा वारंवार बोलतो एकच वाक्य, अनेकांचं मरण पाहणाऱ्या नर्सचा धक्कादायक खुलासा

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here