नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे माघारी घेण्याचा निर्णय घेतला असून या महिन्याअखेरीस सुरु होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात तीनही कृषी कायदे माघारी घेण्याची संवैधानिक प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी घोषणा केलीय. यावर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक केलंय.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या घोषणेचं वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी या घोषणेसाठी ‘गुरु पूरब’च्या विशेष दिन निवडला. प्रत्येक भारतीयाच्या कल्याणाशिवाय आणखी कोणतेही विचार ते करत नाहीत, हेच यातून दिसतंय. त्यांनी उत्कृष्ट राजकीय कौशल्य दाखवलं आहे’ असं ट्विट अमित शहा यांनी केलंय.

भूमी अधीग्रहण आणि कृषी कायदे: आपलाच निर्णय मागे घेण्याची मोदी सरकारवर दुसऱ्यांदा नामुष्की
how three farm laws will be repealed : कृषी कायदे कसे रद्द होणार? काय आहे घटनात्मक प्रक्रिया? वाचा सविस्तर
आणखी एका ट्विटमध्ये अमित शहा म्हणतात, ‘कृषी कायद्यांसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली घोषणा एक स्वागतार्ह पाऊल आहे. ज्याप्रमाणे पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले, भारत सरकार आपल्या शेतकऱ्यांच्या सेवेत कायम राहील आणि त्यांच्या प्रत्यांनात नेहमीच त्यांचं समर्थन करेल’.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी या निर्णयाचं स्वागत करत पंजाबची मागणी पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदींचे आभार मानलेत. तर, दुसरीकडे ‘आंदोलन तत्काळ मागे घेतलं जाणार नाही. आम्ही त्या दिवसाची वाट पाहू जेव्हा कृषी कायदे संसदेत रद्द केले जातील. सरकारनं किमान हमीभावासोबत (MSP) शेतकऱ्यांच्या इतर मुद्द्यांवरही चर्चा करावी’ असं म्हणत तत्काळ शेतकरी आंदोलन स्थगित करण्यास भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी नकार दिलाय.

subramanian swamy : स्वामींचा बोचरा सवाल… ‘चीनने भारताच्या भूभागावर कब्जा केल्याचे मोदी आतातरी कबुल करतील का?’
कृषी कायदे माघारी: मृत शेतकऱ्यांसंबंधी चकार शब्द नाही, सेना खासदाराचं वक्तव्य
Rakesh Tikait: ‘मोदींवर विश्वास नाही’, कृषी कायदे रद्द करण्याच्या घोषणेवर टिकैत यांची प्रतिक्रिया

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here