अकोला: त्रिपुरा येथे झालेल्या घटनेचा निषेधदार्थ अमरावतीमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हिंसक वळण आल्याने त्याठिकाणी गेल्या सात दिवसापासून संचारबंदी लावण्यात आली आहे. पण यामध्ये माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना अटक करण्यात आली. मात्र, दंगल घडवून आणणाऱ्या माजी मंत्र्यांना एका दिवसात जामिनही मिळाला. यानंतर आता माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या विरोधात गृहमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
हे सर्व भाजपचे षड्यंत्र असून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार यांना टिकू द्यायचे नाही असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. अनिल बोंडे यांची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी (राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय महासचिव) जावेद जकरिया यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times