हिंगोली : हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील कनेरगांव इथं एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आयशर गाडीला लटकलेल्या अवस्थेत मालकाचा मृतदेह आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय हनुमंते वय ४५ वर्ष असं या चालकाचं नाव आहे. आयशर गाडीच्या मागच्या फाळक्याला ताराने गळा आवळल्याच्या अवस्थेत आढळून आला. या चालकाची हत्या की आत्महत्या हे माञ अद्याप अस्पष्ट आहे.

घटनास्थळी श्वानपथक व वसमत ग्रामीण पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे. MH 20 EG 5730 असा या गाडीचा नंबर आहे. सध्या या प्रकारानंतर वसमत तालुक्याील नागरिक व वाहन धरकांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झालं आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. आज सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here