हायलाइट्स:
- २६ वर्षांच्या तरूणाचे त्याच्याच कारमधून अपहरण
- एटीएम सेंटरमधून १० हजार रुपये जबरदस्तीने काढले
- नवी दिल्लीतील धक्कादायक घटना
- कारमधून फेकून दिले अन् कारसह आरोपी पसार
- पोलिसांनी तपास करून तिन्ही आरोपींना केली अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पिंटू यादव (वय २३), संजय (वय २६) आणि शिवा भारती (वय ३३) या आरोपींना अटक केली आहे. या तिघांचीही चौकशी सुरू असून, याआधी घडलेल्या लुटमारीच्या घटनांमध्येही त्यांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बुधवारी सकाळी प्रिन्स अभिषेक हा परतत असताना, तीन आरोपी त्याच्या कारमध्ये जबरदस्ती बसले आणि त्याचे अपहरण केले. त्यांनी त्याला एटीएम सेंटरजवळ कार घेण्यास सांगितले. त्यानंतर त्याच्या डेबिट कार्डने एटीएममधून दहा हजार रुपये काढले. त्याच्याकडील दोन मोबाइल फोन हिसकावून घेतले आणि त्याला रस्त्यावर फेकून दिले. कारसह तिघेही पसार झाले.
पोलीस उपायुक्त (पश्चिम) गोयल यांनी सांगितले की, या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांचे विशेष पथक स्थापन करून आरोपी आणि चोरी केलेल्या कारचा शोध घेण्यात आला. राजौरी गार्डन परिसरात कार दिसून आली. त्यांनी कार अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी पोलिसांच्या अंगावरून कार नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांवर गोळीबारही केला. बचावासाठी प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. त्यात कुणीही जखमी झाले नाही. आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर निर्जन ठिकाणी कार आढळून आली. पोलिसांनी शोध घेऊन तिघा आरोपींना अटक केली. पोलिसांनी अपहृत तरुणाकडून चोरलेले मोबाइल त्यांच्याकडून हस्तगत केले. तसेच इतर मुद्देमालही जप्त केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times