मुंबई: ” असं म्हणत आपल्या खास शैलीत ‘करोना’ विरोधात जनजागृती करणारे आणि संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन नेते () यांनी आता ‘महाविकास आघाडी गो’ असा नारा दिला आहे. आठवलेंच्या या नव्या घोषवाक्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

केंद्रातील मोदी सरकारमध्ये मंत्री असलेल्या आठवले यांना भाजपनं पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी घोषित केली आहे. उमेदवार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आठवले यांनी आज विधान भवनात जाऊन राज्यसभेचा अर्ज दाखल केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ‘करोना’च्या आजारावर भाष्य केलं. काही दिवसांपूर्वीच आठवले यांचा एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये आठवले यांच्यासोबत काही विदेशी नागरिकही होते. हे सर्वजण मिळून ‘करोना गो’, ‘करोना गो’ अशा घोषणा देत होते. त्याबद्दल आठवले यांना विचारले असता ते म्हणाले, ‘मी करोनाला गो म्हटलेलं असल्यामुळं तो महाराष्ट्रात आणि भारतातही जास्त प्रमाणात आलेला नाही. असं असलं तरी आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत. आम्ही करोनाला जायला सांगितलं असलं तरी तो येऊ नये यासाठी काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. डॉक्टरांचीही जबाबदारी आहे. ‘करोना’ची लागण आपल्या गावात व शहरात कुणाला होणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे.’

वाचा:

‘करोना’ देशातून जात नाही तोपर्यंत मी ‘करोना गो, करोना गो’ असं म्हणत राहणार आहे. ‘करोना’ला घालवताना ‘महाविकास आघाडी गो’ असंही आम्ही म्हणणार आहे, असा चिमटा आठवले यांनी काढला. त्यावर उपस्थितांमध्ये खसखस पिकली.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here