हायलाइट्स:
- राजस्थानच्या जयपूरमध्ये धक्कादायक घटना
- गर्लफ्रेंडने रागाच्या भरात कापले बॉयफ्रेंडचे गुप्तांग
- तरुणीनेच बॉयफ्रेंडला रुग्णालयात केले दाखल
- धक्कादायक कृत्यानंतर आरोपी तरूणी झाली फरार
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर येथील भांकरोटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. बिकानेर येथील तरूण गेल्या दोन वर्षांपासून योग प्रशिक्षण घेत आहे. योग प्रशिक्षक तरुणीची त्याच्यासोबत मैत्री झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाल्यानंतर दोघे एकमेकांना भेटू लागले. पीडित तरुणाच्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबरला तिने त्याला घरी जेवणासाठी बोलावले. जेवण झाल्यानंतर दोघेही तरुणाच्या घरी गेले. त्याच रात्री तरुणीने प्रियकराचे गुप्तांग कापले.
पीडित तरुणाने पोलिसांना सांगितले की, प्रेयसीने त्याला जेवणातून विषारी औषध दिले. त्यामुळे त्याला झोप लागली आणि तो बेशुद्ध पडला. रात्री दोन वाजता तो शुद्धीवर आला. त्यावेळी कपडे फाटलेले होते. गुप्तांग कापलेले होते. वेदना होऊ लागल्याने तो विव्हळत होता. त्यावेळी त्याने आपल्या प्रेयसीला फोन केला. तेव्हा ती रडत होती. तिने त्याची माफीही मागितली. तरुणाने तिला विनंती केल्यानंतर ती पुन्हा घरी आली आणि त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तरुणाने प्रेयसीविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली.
प्रेयसीच्या अटकेनंतरच कृत्यामागील कारण होणार उघड
घटनेनंतर आरोपी तरूणी फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. तिचा मोबाइल फोन बंद असल्याने तिचे लोकेशन ट्रेस होऊ शकलेले नाही. पीडित तरुणाच्या दाव्यानुसार, तरुणीने त्याला चुकीचे कृत्य करण्यास सांगितले होते. पण त्याने नकार दिला. त्यामुळेच तिने हे कृत्य केले असावे, असे त्याचे म्हणणे आहे. दरम्यान, तरुणीला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत खरे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times