अमरावती : महावितरण विभागाच्यावतीने इंटरनेट सुविधा व संचारबंदीमुळे वीजबिल भरण्याची १५ ते २० नोव्हेंबर पर्यंत ड्यूडेट असलेल्या ५५१७२ वीज ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी अतिरिक्त भुर्दंड न लावता महावितरणकडून लास्ट वार्निंग देण्यात आली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी आपली वीज देयके वेळेत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरात घडलेलेल्या अनुचित घटनाच्या पार्श्वभूमिवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीत दिनांक १२ ते १९ नोव्हेंबर दरम्यान इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली होती. त्यामुळे महावितरणचे वीज बिल संकलन केंद्रेही इंटरनेट अभावी बंद होती. शिवाय संचार बंदी व इंटरनेट बंदमुळे ग्राहकांना ऑनलाईन वीजबिल भरण्यासही असुविधा निर्माण झाली होती. पुणे हादरलं! आधी फेसबूक लाईव्ह आणि नंतर १३ व्या मजल्यावरून उडी घेत वेटरची आत्महत्या परंतू, महावितरणचे वीजबिल दिलेल्या तारखेनंतर भरल्यास भुर्दंड स्वरूपात लागणारा अतिरिक्त शुल्क ग्राहकांना लागू नये म्हणून महावितरणकडून ड्यू डेट १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान असलेल्या ग्राहकांना वीजबिल भरण्यास २३ नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. अमरावती शहरात एकून ५५ हजार १७२ ग्राहक असे आहेत की ज्यांची वीजबिल भरण्याची ड्यू डेट १५ ते २० तारीखेदरम्यान आहे. त्यामुळे या वीज ग्राहकांनी याची नोंद घेत २३ नोव्हेंपर्यंत वीज देयकाचा भरणा करू शकतात. तसेच वीज ग्राहकाची सोय म्हणून महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे रविवारी सुट्टीच्याही दिवशी सुरू ठेवण्यात आली आहे.