पिंपरी-चिंचवड शहरातील विषाणूच्या पाच संशयित रुग्णांना वायसीएम रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. त्यांची तपासणी केली असता, पाचपैकी तीन रुग्णांना करोनाची लागण झाल्यानं निष्पन्न झालं आहे. उर्वरित दोन जणांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. या दोघांना घरी सोडण्यात आलं आहे. तर लागण झालेल्या तीन रुग्णांना उपचारासाठी वायसीएममधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.
सर्व्हे करणार
आणि पिंपरी-चिंचवड शहरात चार विभाग निश्चित केले असून, त्यात तीन मीटर परिसरातील घरांमधे सर्व्हे केले जाणार आहे. त्यातील ६५० घरांमध्ये सर्व्हे केले आहे. करोनाची लक्षणं आढळून आल्यास संबंधित नागरिकांना स्वतंत्र वॉर्डमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला जाईल, असं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं.
पुण्यातील नायडू रुग्णालयात ५४ संशयित
पुण्यातील ४२ रुग्णांच्या चाचणीचे अहवाल अद्याप आले नाहीत. तर नायडू रुग्णालयात आता ५४ रुग्ण आहेत. नायडू रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times