हायलाइट्स:
- दोन दिवसांपूर्वी माओवादी संघटनेचा नेता प्रशांत बोसला अटक
- बोसची पत्नीला शीला मरांडीही अटकेत
- मावद्यांकडून प्रशांत बोस्चा यांनी ‘राज्य कैदी’ असा उल्लेख केला आहे.
स्फोटानंतर अवघ्या काही वेळातच मुंबई – हावडा मेल या रुळावरून जाणार होती. मात्र, स्फोटाच्या तीव्र आवाजानंतर मुंबई – हावडा मेल घटनास्थळाकडे जाण्यापूर्वीच रोखण्यात आली.
लातेहारमध्येही रेल्वे रुळांवर स्फोट
यापूर्वी शुक्रवारीही रात्री उशिरा जवळपास १.०० वाजल्याच्या दरम्यान टोरी – लातेहार दरम्यान रेल्वे रुळांवर स्फोट घडवून आणला गेला होता. या घटनेनंतर या रुळावरची वाहतुकही रोखावी लागली. रेल्वेच्या टीमनं रुळांचं काम सुरू केलंय.
कोण आहे प्रशांत बोस?
सीपीआय – माओवादीचे पॉलिट ब्युरो सदस्य प्रशांत बोस याच्यावर एक कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. झारखंड पोलिसांनी त्याला दोन दिवसांपूर्वी अटक केली. प्रशांत बोससोबत त्याची पत्नी शीला हिलादेखील अटक करण्यात आलीय. सीपीआय-माओवादीचा प्रशांत बोस हा दुसऱ्या क्रमांकाचा नेता मानला जातो. तो बिहार आणि झारखंडमध्ये संघटनेचा चेहरा म्हणून परिचित आहे.
प्रशांत बोसच्या अटकेनंतर माओवाद्यांना मोठा झटका बसलाय. आज माओवाद्यांकडून २४ तासांचा ‘भारत बंद’ घोषित करण्यात आलाय. यासंबंधी अनेक पोस्टर झळकावण्यात आलेत. यावर प्रशांत बोसचा उल्लेख ‘राजकीय कैदी’ असा करण्यात आलाय. यासोबतच, त्याच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त करत योग्य उपचारांची व्यवस्था करण्यास माओवाद्यांकडून सांगण्यात आलंय. याच दरम्यान माओवाद्यांनी चाईबासा रेल्वे रुळावर लँन्डमाईन्सचा वापर करत स्फोट घडवून आणले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times